![]() |
कागणी : वारी नावाच्या शेतात मारुती केरबा भोगण यांचे रानडुकराने नुकसान केलेले भुईमूग पिक. |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
विविध गावांच्या रानमाळा जवळील शिवारात दिवसेंदिवस रानडुकरांचा उच्छाद वाढत असून कागणी (ता. चंदगड) येथील वारी नावाच्या शेतात काही दिवसापासून विविध पिकात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा धुडगूस सुरू आहे. शनिवारी (दि. 11) कागणी (ता. चंदगड) येथील शेतकरी मारुती केरबा भोगण यांच्या वारी नावाच्या शेतात सुमारे एक एकर इतके भुईमूग पिक रानडुकराच्या काळपाने पूर्णपणे उखडून टाकले आहे. हाता तोंडाला आलेले भुईमूग पिक उखडून टाकल्याने सदर शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचा फटका बसला आहे. वन खात्याने त्वरित या पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दुर्गाडी या ठिकाणापासून रानडुकरांचा कळप विविध शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये धुडगूस घालत आहे.
No comments:
Post a Comment