![]() |
ताम्रगड प्रतिष्ठान आयोजित कोवाड येथील मॅरेथॉन स्पर्धेची क्षणचित्रे |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ताम्रगड प्रतिष्ठान आयोजित कोवाड (ता. चंदगड) येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या विवध गटात एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेते खेळाडू गटनिहाय पुढीलप्रमाणे-
*मोठा गट -मुले*
प्रतीक पाटील ( म्हाळेवाडी )
मारुती डोंबले ( कारवे )
बाबू गावडे (सोनारवाडी )
भावेश पाटील (म्हाळेवाडी
रणजित गडदे -(इनाम सावर्डे)
अनिल गावडे (कोलीग )
अथर्व नागरदळेकर (कुदनूर )
स्वयंम पाटील ( नागरदळे )
*मोठा गट ( मुली)*
जानव्ही मोहणगेकर (किणी )
नूतन बोंगाळे (केंचेवाडी )
प्रेरणा जोशीलकर (किणी )
विद्या बिर्जे ( धुमडेवाडी )
रसिक पाटील (धुमडेवाडी )
*पाच किमी मुले*
मोहन पाटील (हाजगोळी)
संकेत मोरे (राजगोळी खुर्द)
सुमित तुप्पट (जंगमहट्टी)
श्रेयस कांबळे (आमरोळी)
सोहम वांद्रे (सातवणे)
आदित्य मुतगेकर (कालकुंद्री)
श्रीमुख कडोलकर ( राजगोळी खुर्द)
श्रीमुख पाटील (निट्टूर )
*पाच किमी मुली*
भूमी बेळगावकर (हुंदळेवाडी)
सुरभी चव्हाण (विंझणे)
जानव्ही रेडेकर (मुगळी)
राधिका बागीलगेकर (कालकुंद्री)
आदिती कुंभारकोप (मुगळी)
प्राथना पवार (विंझणे)
*लहान गट मुले ३ की मी*
वेदांत पाटील (मौजे कारवे)
भैरव जोशी (कालकुंद्री)
शुभम पाटील (निट्टूर )
संग्राम जोशी (कालकुंद्री)
निखिल पाटील (कालकुंद्री)
समर्थ पाटील (घुल्लेवाडी)
जय मोहणगेकर (किणी )
प्रतिक नौकुडकर (मांडेदुर्ग )
*मुली लहान गट ३ किमी*
शांभवी जाधव (विंझणे )
प्राजक्ता लोहार (करेकुंडी)
नव्या मोरे (खनेट्टी )
निधी बेनके (बसर्गे)
गीता गुरव (हाजगोळी )
भक्ती पाटील (मलतवाडी )
कादंबरी बागीलगेकर (कालकुंद्री )
पूजा गिलबिले (विंझणे).
हे स्पर्धक यशस्वी ठरले. विजेत्या खेळाडूंना पदक, गौरव चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या मॅरेथॉन स्पर्धेत चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी १० किलोमीटर अंतर पार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गतवर्षीही त्यांनी जाणीवपूर्वक उपस्थित राहून १० किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. मॅरेथॉन स्पर्धेचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. आपल्या फिटनेस मधून त्यांनी चंदगड तालुक्यातील तरुणांना एक वेगळा संदेश या निमित्ताने दिला आहे.
चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, दिग्विजय कुराडे, माजी जिप सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन. आर. पाटील, नरसू पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंगला तोगले, दयानंद सलाम, सुभाष बेळगावकर, संजय कुट्रे, डॉ.आशितोष आंधळे, एस. एम. फर्नाडिस उपस्थित होते. युवा पटकाविला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. टी. पाटील, नरेंद्र हिशोबकर, पी. जे. मोहनगेकर, निवृत्ती बेनके, व्ही.आर. मोहनगेकर ,निवृत्ती पाटील, दादा भोगूलकर आदींनी परिश्रम घेतले. नामदेव धनकुटे यांनी सूत्रसंचालन केले. पद्माकर गवेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment