चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की, अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला 7/12 आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरुन आपल्याला एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील शासनाकडील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल. जर आपण फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला भविष्यात शासनाकडुन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रा, महा-ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरमध्ये जाऊन 7/12 ला आधार लिंक करुन घ्यावे व फार्मर आयडी बनवुन घ्यावा. असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
फार्मर आयडी बनविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक
3) सर्व 7/12 व 8 अ उतारे
शेतकरी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया दि. 25 मे, 2025 पुर्वी पुर्ण करावयाची आहे. अन्यथा शासकिय लाभास फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) नसणारे शेतकरी वंचित राहतील. Agristack Registration च्या अनुषंगाने कोणतीही अडचण उद्भवल्यास आपल्या गावचे तलाठी / ग्रामसेवक / कृषीसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी नायब तहसिलदार हेमंत काम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment