![]() |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सहा पदरी होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे रुंदीकरण अभावी रेंगाळत पडलेल्या बेळगाव- वेंगुर्ला महामार्ग रुंदीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे. या राजमार्गावरील पाटणे फाटा या वर्दळीच्या ठिकाणी उद्या दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता हा रास्ता रोको करण्यात येणार आहे. अशी माहिती उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिली आहे.
या रस्त्याची रुंदी गेल्या पन्नास वर्षात जैसे थे आहे. तथापि वाहनांची संख्या मात्र ५० पटींनी वाढली आहे. वाहनांच्या या गर्दीमुळे राज्य मार्गावरील अपघातांची संख्या कमालीची वाढली आहे. रुंदीकरण अभावी अपघातांच्या रूपाने रोज होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी रुंदीकरणाची आवश्यकता आहे. तथापि शासनाकडून या महत्त्वाच्या कामाकडे कोणतेच लक्ष नाही. रेंगाळलेल्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले आहे.
आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, कोल्हापूर जिल्हा सह संपर्क प्रमुख रियाज भाई शमनजी, शिवसेना उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, विधान सभा प्रमुख राजू रेडेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, विष्णू गावडे, संजय पाटील, संजय गुंडप, महादेव गावडे, दिलीपराव माने, युवराज पोवार, विक्रम मुतकेकर, महेश पाटील, किरण नागुर्डेकर आदींसह तालुक्यातील विभाग प्रमुख सर्व शाखाप्रमुख शिवसैनिक सहभागी होणार आहेत यावेळी तालुक्यातील नागरिका वाहनधारक यांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे. असे आवाहन जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुकाप्रमुख आणि केले आहे.
No comments:
Post a Comment