चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे पुजारी विजय भाऊसाहेब काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २०) कलाश्री ग्रुपच्या सोडत बक्षीस कार्यक्रम होत आहे. खानापूर रोड, उद्यमबाग येथील कलाश्री टॉवरच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व साई भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कलाश्री उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी केले आहे. सोडत मधील मुख्य विजेत्याला ५१ हजार रुपये रोख रक्कम आणि अन्य चार विजेत्यांना चार फॅन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.
उद्यमबागमधील कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर या उद्योग समूहातर्फे सुरू असलेल्या ग्राहक बक्षीस योजनेची सोडत तसेच महात्मा फुले गल्ली, वडगावमधील लक्ष्मीनारायण वधू-वर केंद्रातर्फे मेळावा असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवारी (दि. २०) दुपारी होणार आहे. दुपारी दोन ते पाच यावेळेत वधूवर मेळावा होणार आहे. सर्व जातीधर्मातील उच्च शिक्षित, शहर, ग्रामीण, प्रथम व प्रौढ घटस्फोटीत विधवा, वधू, अपंग, आंतरजातीय स्थळांसाठी इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ५ वाजता कला श्री उद्योग समूहातर्फे सोडत कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम कलाश्री टॉवर, उद्यमबाग, शगून गार्डनच्या समोर खानापूर रोड येथे होणार आहे. सभासदांनी व वितरकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कलाश्री ग्राहक बक्षीस योजनेच्या सोडत कार्यक्रमासाठी सायंकाळी ४ वाजता वेळेत उपस्थित राहणाऱ्यापैकी सोडत पद्धतीने चौघा जणांना विशेष भेटवस्तू व उच्च दर्जाची साखर ३० रुपये किलो या दराने देण्यात येणार आहे. त्यामुळे याचा लाभ ही सर्व ग्राहकांना नागरिकांना घेता येतो.
No comments:
Post a Comment