आजरा : सी एल वृत्तसेवा
आजरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना व युवा सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे व उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी जेष्ठ शिवसैनिकांना फेटे बांधून शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेल्या कार्याविषयी आदर व्यक्त करण्यात आला. तसेच आजरा बस स्थानकात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन जिलेबी वाटप करण्यात आले. त्यानंतर आजरा संपर्क कार्यालय येथे शिवसैनिकांना फळझाडांची रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख युवराज पवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश पाटील, दयानंद भोपळे, अमित गुरव, चंद्रकांत वरकटे, दिनेश कांबळे, सुयश पाटील, रोहन गिरी, शिवाजी आढाव, संजय येसादे, महादेव सुतार, शंकर संकपाळ, आनंदा कोरगावकर, भीमा गुरव, विष्णू रेडेकर, तानाजी डोंगरे, महादेव गुरव, इमाम चांद, बापू दळवी, मारुती मलगुतकर, मधुकर पाटील, रवी सावंत,प्रदीप पाचवडेकर, महिला तालुका संघटिका गीता देसाई, सागर नाईक आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसह एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment