मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज ; सौ.भारती डेळेकर, सोहाळे-बाची ग्रुप ग्रामपंचायत व देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या मार्फत आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2025

मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज ; सौ.भारती डेळेकर, सोहाळे-बाची ग्रुप ग्रामपंचायत व देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या मार्फत आरोग्य तपासणी

 


आजरा: गोपाळ गडकरी, सी.एल. न्यूज

   आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते.

सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे बाची व देसाई हॉस्पिटल कार्डियाक केयर सेंटर गडहिंग्लज यांच्या सहकार्यातून व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मौजे सोहाळे येथील सुप्रभात वाचनालय सोहाळे च्या इमारती मध्ये केले. या शिबिरात मौ. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने  सहभाग घेतला. शिबिरामध्ये मोफत हृदयरोग, मूत्ररोग व नेत्ररोग निदान करून रक्त व लघवी तपासणी व ecg मोफत करण्यात आली. तसेच शिबिराचे औचित्य साधून ग्रामस्थांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चे वाटप करणेत आले.मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी संपन्न पार पाडणेकामी

डॉ. चंद्रशेखर देसाई (M.D) व डॉ. रोहित देसाई (M.D) देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांचे मोलाचे सहकार्य लाभले

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सोहाळे च्या वतीने सरपंच सौ. भारती डेळेकर  यांनी यावेळी केले. प्रसंगी सोहाळे गावचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ, देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज कडील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ व सुप्रभात वाचनालय चे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment