ग्रामदैवत भावेश्वरी मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ धार्मिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2025

ग्रामदैवत भावेश्वरी मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ धार्मिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न

 


आजरा: गोपाळ गडकरी, सी. एल. न्यूज

      मुमेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामदैवत भावेश्वरी मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ अत्यंत धार्मिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. या पावन प्रसंगी नुलमठाचे परमपूज्य गुरुवर्य गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

    मंदिर हा गावाच्या आध्यात्मिक उर्जेचा केंद्रबिंदू असून, अशा पायाभरणीने ग्रामस्थांच्या श्रद्धेला नवे रूप मिळते, असे मत यावेळी व्यक्त केले. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात 750 हुन अधिक मंदिरे बांधणारा महाराष्ट्र राज्यातील एकमेव मंत्री म्हणजे हसन मुश्रीफ आहेत, असे उद्गार नुलमठाचे परमपूज्य गुरुवर्य गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले. लोकांची सेवा करणारा खरा राजा म्हणजे मंत्री मुश्रीफ आहेत, असेही महास्वामीजींनी उद्गार काढले.

        या कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई, आजरा कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, माजी जि. प. सदस्य उमेशराव आपटे, मुमेवाडीचे बबनराव पाटील, काशिनाथ तेली, मारुतराव घोरपडे (सर), शिरीष देसाई, दीपक देसाई, राजेंद्र चव्हाण, विजय गुरव, सचिन परीट एकनाथ पाटील, रामदास साठे, संतोष काटे, रवींद्र कांबळे, वैभव कांबळे, गणपती राजीगरे, गणेश परीट, सरपंच आनंदी परीट, बंडू कडाकणे, शिवाजी दोरुगडे, डी. के. परिट, किरण भोसले, रवी इंगळे, आनंदा कडाकणे, आकाराम बेलकर, बचाराम माद्याळकर यांच्यासह सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment