![]() |
चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना आमदार शिवाजीराव पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीची आज संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा कोल्हापूर (पश्चिम) जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.
यावेळी स्वतः गेल्या ५ वर्षात चंदगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळेच २०२४ च्या विधानसभेत विजय खेचून आणता आला. यापुढेही तितक्याच ताकदीने भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये संघटना बांधणी खुप महत्वाची आहे. एक परिवार म्हणून सर्वांनी काम करुन सर्व निवडणुकांमध्ये भाजपाचाच झेंडा फडकवण्यासाठी एकजूटीने ताकद लावू असे सांगितले. तसेच यावेळी संघटनात्मक काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांना सांगितल्या.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, धीरज करळकर (जिल्हाध्यक्ष भाजयुमो), डॉ. आनंद गुरव-आसंडोलीकर, दिपकदादा पाटील, सचिन बल्लाळ, हेमंत कोलेकर, शांताराम पाटील, बबन देसाई, जयवंत चांदेकर, बसवराज कंकणवाडी, यशवंत सोनार, संतोष तेली, जयवंत सुतार, दिग्विजय देसाई, विजय पाटील, विशाल बल्लाळ, अरूण मोकाशी, चंदगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मंडल अधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपरवॉरीअर्स आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment