कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील मुळचे रहिवाशी व सध्या माणगाव येथे वास्तव्यास असलेले पिराजी दत्तू परीट (वय ६८) यांचे रविवार दि. १५ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते दौलत सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. कालकुंद्री येथील सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विठ्ठल के. परीट यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या गुरुवार दि. १९ रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment