आवंडी धनगरवाड्याचा पहिला फौजी देशसेवेसाठी सज्ज, विठ्ठल बयाजी येडगे याचे जल्लोषात स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2025

आवंडी धनगरवाड्याचा पहिला फौजी देशसेवेसाठी सज्ज, विठ्ठल बयाजी येडगे याचे जल्लोषात स्वागत


आजरा : गोपाळ गडकरी/सी एल न्यूज
     आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाडा क्र १ येथील विठ्ठल बयाजी येडगे या जवानाने सात महिन्याचे सेना वायु रक्षा प्रशिक्षण पूर्ण करून गावी आल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
     धनगरवाड्यावरील पहिलाच युवक सैन्यात दाखल झाल्यामुळे प्रत्येकाचा आनंद गगनात मावेना त्याच्या आगमनाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



   पारंपारीक वाद्याच्या गजरात आणि महिलांचे लेझिम पथकाच्या तालावर विठ्ठल ची सजलेली जीप मधून मिरवणूक काढण्यात आली.
   बाबू  ठकू येडगे सामाजिक कार्यकर्ते यांचा नातू व बयाजी येडगे यांचा मुलगा, येडगे कुटुंबीयाचे सामाजिक कार्यात तसेच चित्री प्रकल्प यासाठी लढा देवून सर्व सर्वस्व पणाला लावणारे हे येडगे कुटूंब यातूनच एक रोप लावले ते म्हणजे विठ्ठल देश सेवेसाठी भारतमाता सरंक्षणासाठी निवड झाली. हे मोठे योगदान आहे.धनगरवाड्यावरील पहिलाच युवक सैनिक प्रशिक्षण देऊन यशस्वी झाला त्याचे ग्रामस्थांचे मार्फत स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वेळी गोकूळच्या संचालिका, अंजनाताई रेडेकर, कॉ. संपत देसाई राजू होलम, दरीसर, यांनी विठ्ठल यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि देश सेवेसाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी किले.
     या कार्यक्रमासाठी जिल्हा बँक संचालक, सुधीरभाऊ देसाई, राजाराम पोतनीस, संजयभाऊ सावंत, युवराज पोवार, आप्पा पाटील श्री. लटकेसाहेब वनविभाग, चंद्रकांत पाटील, जोतीबा खामकर, सरपंच बयाजी मिसाळ, उप सरपंच कोकरे, विजय थोरात, तानाजी मिसाळ यांच्यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment