शौर्याच्या स्मृतीस्थळी तेजाचा दीप! नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर पुतळा परिसरात हायमास्ट दिव्यांचे उद्घघाटन - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2025

शौर्याच्या स्मृतीस्थळी तेजाचा दीप! नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर पुतळा परिसरात हायमास्ट दिव्यांचे उद्घघाटन

 


नेसरी / सी एल वृत्तसेवा
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय स्वराज्य स्थापनेत प्राणांची आहुती देणारे, रणधुरंधर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरी (ता. गडहिंग्लज )  येथील अश्वारूढ पुतळा परिसरात माजी आमदार राजेश पाटील  यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजन मधून हाय मास्ट दिव्यासाठी एकूण ४.४१ लक्ष इतका निधी मंजूर केला होता. या कामाचे लोकार्पण आज माजी आमदार  पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



     यापूर्वी नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारकजवळ राजेश पाटील यानी आमदार फंडातून आशा प्रकारचा हायमास्ट दिव्यासाठी निधी मंजूर करून  तेथील ऐतिहासिक स्थळ तेजोमय केले.त्याबद्दल नेसरी ग्रामस्थानी राजेश पाटील यांचेआभार मानले. नेसरी बस स्टॉप चौकातील
हा केवळ प्रकाशस्तंभ नाही, तर स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेला उजाळा देणारा श्रद्धेचा साक्षीदार आहे.
     रात्री हा पुतळा परीसर  उजळला . आता या ऐतिहासिक स्मारकाच्या व चौकाच्या सुरक्षिततेसाठी, सौंदर्यासाठी, आणि इतिहासाशी नाते जोडण्यासाठी येथून पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजेश पाटील यानी यावेळी बोलताना सांगितल. या कार्यक्रमासाठी नेसरी गावच्या सरपंच सौ.गिरिजादेवी शिंदे,मुन्नासो नाईकवाडी,अभयदादा देसाई, प्रताप पाटील,अमर हिडदुगी,शिवराज देसाई, रणजीत पाटील,संदीप शिंदे, दयानंद नाईक,दिनकर मेटकर,प्रकाश दळवी, किरण हिडदुगी, तसेच नेसरी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ व भागातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment