आजरा : गोपाळ गडकरी/ सीएल न्यूज
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या 28TH CAPT. S. J. EZEKIEL MEMORIAL MAHARASHTRA STATE SHOOTING CHAMPIONSHIP NOVICES या ५० मीटर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या महंमदजैद हसन मकानदार या विद्यार्थ्याने ५२४ गुण मिळवत नेत्र दीपक कामगिरी बजावली. यामुळे तो पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याला आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, पदाधिकारी, संचालक मंडळ, प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, वर्गशिक्षक, पी. एस. गुरव, क्रीडाशिक्षक एस. एम. पाटील , एनसीसी ऑफिसर एम. एस. पाटील व विषय शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले. महंमदजैद सह त्याचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment