आजरा : सी एल वृत्तसेवा
मार्च 2025 एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भादवण हायस्कूल (ता. आजरा) मध्ये संपन्न झाला. स्वागत नूतन मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे खजिनदार सुनील पाटील होते. त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ संचालक के. जी. पटेकर यांनी आजरा महाल शिक्षण मंडळ,आजरा संस्थेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन विविध विद्याशाखांच्या वाटचालीचा आढाव घेतला. यशस्वी विद्यार्थी कस्तुरी किरण तुरंबेकर (प्रथम क्रमांक), वैष्णवी आनंदा पाटील (द्वितीय क्रमांक), तृप्ती श्रीकांत देसाई ( तृतीय क्रमांक), भक्ती आनंदा मुळीक (चतुर्थ क्रमांक), सिद्धी दीपक खुळे (पाचवा क्रमांक), विभागून प्रणव राजेंद्र शिवगंड तसेच (मागासवर्गीय प्रथम), स्वागत अशोक कांबळे यांचा सत्कार संचालक के.जी.पटेकर, सुधीर जाधव, पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
याशिवाय एकता खुळे, सार्थक कांबळे, राज शिंत्रे (इयत्ता 5वी ), वेदांत उंडगे, आरोही पाटील, पियुष जाधव (6वी ), संस्कृती कुराडे, आदिराज देसाई, सोहम कुराडे, (7वी ), प्रतिक्षा डोंगरे, सानिका वडराळे, भूमिका मुळीक (8वी), लक्ष्मी चौगुले, सेजल पाटील, प्राची केसरकर (9वी ), शुभम तोरगले अनुक्रमे (प्रथम, द्वितीय,तृतीय) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस.परीक्षेतील सारथीपात्र विद्यार्थी प्राची शिंत्रे, प्रतिक्षा डोंगरे, आर्या कुंभार, भूमिका मुळीक, सुशांत खुळे, आदिराज डोंगरे तसेच कै. मनाली उत्तम रेडेकर यांचे स्मरणार्थ अंकिता उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा लता उत्तम रेडेकर यांनी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून गरीब होतकरू सानिका मुळीक, नेहा सोंडकर,अनिता गुरव, समीक्षा पाटील, पायल सुतार, श्रावणी शिमणे या विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य करण्यात आले. गरीब होतकरू विद्यार्थी सुयश गवळी, जयेश कांबळे समर्थ कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक एस. एस. नाईक, बी.पी.कांबळे, एम. एम. यलगार, एम.एम.देसाई, ए. डी. पाटील, पी. एस. गुरव, एम. एम. जाधव, आर. पी. होरटे, व्ही. एस. कोळी, पी. एम. वडर, लिपिक एस. के. पोवार, मारुती गोडसे, संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संचालक के. जी. पटेकर, माजी मुख्याध्यापक टी. ए. पाटील, संजयकुमार पाटील, सेवानिवृत्त टीपीओ टी. बी. मुळीक, कस्तुरी तुरंबेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रय शिवगंड, तंटामुक्त समिती सदस्य संभाजी हळवणकर, बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी एन.बी.कुंभार, कुलस्वामिनी पतपेढी, मुंबईचे चेअरमन निवृत्ती पाटील, विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. होरटे व आभार पी. एस. गुरव यांनी मानले.
No comments:
Post a Comment