आजरा : सी एल वृत्तसेवा
जेऊर येथील बामनादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आज झालेल्या सभेत चेअरमन म्हणून आनंदा नार्वेकर तर व्हा. चेअरमन सुनीता पोवार यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी टी. आर. खणदाळे होते. नूतन चेअरमन आनंदा नार्वेकर यांचा सत्कार माजी चेअरमन खणदाळे यांच्या हस्ते तर व्हा चेअरमन सरिता पोवार यांचा सत्कार कृष्णा गुडुळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना आनंदा नार्वेकर म्हणाले, ``सर्व संचालक आणि सभासदांना विश्वासात घेऊन संस्था प्रगतीपदावर नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. यावेळी माजी चेअरमन कृष्णा गुडुळकर, दशरथ घुरे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संचालक मारुती चव्हाण, शामराव गुडुळकर, बंडू गुडुळकर यांच्यासह नूतन संचालक उपस्थित होते. संस्थेचे मॅनेजर तानाजी मिसाळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment