चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) अंतर्गत फळबाग लागवड प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अत्युत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सहायक कृषि अधिकारी सुरेश जाधव यांचा गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी व चंदगड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून त्यांचे सन्मानपत्र देण्यात आले.
![]() |
चंदगड पंचायत समिती येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र देताना तहसिलदार राजेश चव्हाण |
श्री. जाधव यांनी केलेले प्रामाणिक आणि नियोजनबद्ध कार्य, लाभार्थ्यांशी केलेली समन्वय प्रक्रिया, वेळेत उद्दिष्ट पूर्ण करणे आणि गुणवत्तापूर्ण काम यामुळे गाव, तालुका व जिल्हा येथे फळबाग लागवडीस चालना मिळाली आहे. या कार्यामुळे ग्रामीण भागातील शाश्वत रोजगार आणि पर्यावरण संतुलनास हातभार लागला आहे. या कार्याबद्दल त्यांचा चंदगड पंचायत समिती येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
श्री. जाधव यांनी चंदगड तालुक्यातील नांदवडे, हेरे, खालसा सावर्डे, शिप्पूर, खालसा कोळींद्रे या गावांत त्यांनी हे काम केले आहे.
No comments:
Post a Comment