गडहिंग्लज (ता. 3 जुलै 2025) –
कै. भूषण गुंजाळ स्मृतिदिनानिमित्त संवेदना फाउंडेशन व भूषण गुंजाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज तालुक्यातील आई-वडील दोघेही हयात नसलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नेहमी उपयुक्त साहित्य वाटप व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. “संवेदना भूषण” कार्यक्रम गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज येथे गुरूवार, दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवेदना फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य सागर रामचंद्र पवार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून गटशिक्षणाधिकारी नवल कुमार हलबागोळ, प्राचार्य पी. टी. पाटील, संवेदना प्रतिनिधी अॅड. एम. ए. पाटील, साहित्य संवेदना सदस्य अॅड. आनंदा अस्वले, निसर्गमित्र टीम प्रमुख गिरीधर रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम संकल्प सिद्धी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, गडहिंग्लज. डॉ.अमोल जाधव सह डॉक्टर टीम यांनी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले. संवेदना सचिव संतराम केसरकर यांनी प्रास्ताविकात गेल्या ८ वर्षातील कार्याचा आढावा व कार्यक्रमाची उद्दिष्टे विषद केली.
आपल्या मनोगतात गटशिक्षणाधिकारी श्री. हलबागोळ यांनी “संवेदना फाउंडेशनच्या कार्यास शिक्षण विभागाचे सदैव सहकार्य राहील” असे सांगितले. प्राचार्य पी. टी. पाटील यांनी “संवेदनाचे उपक्रम आमच्या शाळेत नेहमीच स्वागतार्ह असतील” असे मत व्यक्त केले. अॅड. एम. ए. पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यात संवेदनाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. अॅड. आनंदा अस्वले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य सौ. प्रणिता शिपुरकर यांच्या वतीने सर्व मुलांना पेन भेट देण्यात आले.
कार्यक्रमास संवेदना भूषण टीम प्रमुख संजय हरेर, महिला शक्ती टीम सदस्या सौ. मिलन केसरकर, संवेदना ज्येष्ठ नागरिक सदस्य चंद्रशेखर बटकडली (आण्णा), अॅडमिन श्रीतेज कवळेकर, फिलिप रॉड्रीक्स आदींची उपस्थिती लाभली. या उपक्रमाच्या माध्यमातून गडहिंग्लज तालुक्यातील ५० अनाथ विद्यार्थ्यांच्या जीवनात एक सकारात्मक स्पर्श घडविण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साध्य करण्यात आला.
No comments:
Post a Comment