![]() |
सुंडी धबधबा येथे अधिकाऱ्यांनी भेट देवून कमिटीचे कौतुक केले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पर्यटन विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा सुंडी येथील सवती वझर घबधबा क्षेत्र अतिशय सुंदर आहे. किल्ले महिपाळगडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात हा धबधबा असल्याने पर्यटकांनाही पर्वणी आहे. पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. तरीही येथील धबधबा स्थानिक विकास कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी येथे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
पदरमोड करून व पर्यटकांकडून नाममात्र विकासनिधी जमा करून हा विकास सुरू आहे. मात्र यापुढे शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी वृषाली यादव, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी देऊन सुंडी येथील धबधबा स्थानिक कमिटीचे कौतुक केले. येत्या आठ-पंधरा दिवसात आमदार शिवाजीराव पाटील व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनाधबधबा स्थळावर भेटीसाठी आणून येथील परिस्थितीची जाणीव करून देणार असून यासाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितले. पर्यटक धबधबा ठिकाणी उतरत असताना आधारासाठी असलेले लोखंडी ग्रील सध्या मोडकळीस आले आहेत. ते दुरुस्त करून घ्यावेत, महिला पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. पोलीस बंदोबस्त दररोज उपलब्ध होणार नाही. शक्य असेल त्यावेळी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल. त्याचबरोबर गावातील तरुणांवर ही जबाबदारी शनिवार व रविवार दोन दिवस समितीने द्यावी. अशा मौल्यवान सूचना यावेळी कमिटीला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आल्या.
यावेळी धबधबा समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष एन. एम. पाटील, सचिव संजय पाटील, खजिनदार प्रताप पाटील, व्ही. एस. पाटील, सुबराव पाटील, यादु पाटील, राणबा पाटील, कोणेरी पाटील, तानाजी टक्केकर, सरपंच मनोहर कांबळे, माधुरी पाटील, वैजनाथ सरशेट्टी, जी. वाय. कांबळे, रामकृष्ण पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment