कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील होसूर, कौलगे बुक्कीहाळ खुर्द व बुद्रुक, करेकुंडी, सुंडी या भागातील ग्रामस्थ, विद्यार्थी यांना अद्याप बसची सुविधा नाही. परिणामी येथील ग्रामस्थ शाळा कॉलेजचे विद्यार्थी रुग्ण यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ढोलगरवाडी पासून या मार्गावर एसटी बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी चंदगड तालुका बहुजन मुक्ती पार्टी यांच्यावतीने गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी 'एक दिवसीय धरणे आंदोलन' करण्यात येणार आहे.
होसूर येथे होणाऱ्या या आंदोलनात सुंडी, करेकुंडी, बुक्कीहाळ खुर्द, व बुद्रुक, कौलगे, होसूर, किटवाड, कल्याणपूर या गावातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सामील होवून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी साथ-सहयोग, सहकार्य करून पाठिंबा द्यावा. असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment