विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांप्रमाणे जीवन जगावे – राजेंद्र शिवणगेकर यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2025

विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांप्रमाणे जीवन जगावे – राजेंद्र शिवणगेकर यांचे आवाहन



चंदगड / सी एल वृत्तसेवा

बागिलगे डुक्करवाडी : लोकमान्य टिळकांचे जीवन म्हणजे राष्ट्रभक्ती, शिक्षणप्रेम, सामाजिक जागृती आणि संघर्षमय नेतृत्वाचे प्रतीक आहे. टिळकांनी दाखवलेल्या जिद्दीने, अभ्यासाच्या वृत्तीने आणि देशभक्तीच्या भावनेने आजच्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते राजेंद्र शिवणगेकर यांनी केले.

येथील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एस. मगदूम यांनी करून टिळकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

“टिळकांचे जीवन म्हणजे जिद्द, अभ्यास, देशभक्ती आणि नेतृत्व यांचे मिश्रण आहे. ‘विद्या हेच सामर्थ्य’ आणि ‘कर्तव्य हेच धर्म’ या तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवावे,” असे शिवणगेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन एम. एन. शिवणगेकर यांनी केले. यावेळी ए. बी. नाईकवाडे, व्ही. डी. पाटील, एस. जी. पाटील, व्ही. जे. कालकुंदरीकर , एस व्ही यादव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment