शिक्षक समितीच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी जोशी, सरचिटणीसपदी पाटील यांची त्रैवार्षिक अधिवेशनात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2025

शिक्षक समितीच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी जोशी, सरचिटणीसपदी पाटील यांची त्रैवार्षिक अधिवेशनात निवड



चंदगड : सी एल वृत्तसेवा 
       न्यायाची चाड अन्यायाची चीड हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षकांच्या जिव्हाळ्याची विविध प्रश्न व समाजिक बांधीलकीसाठी झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चंदगड चे  त्रैवार्षिक अधिवेशन हलकर्णी ता चंदगड येथे २०/०७/२०२५ उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी  जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर होते.
     मावळते अध्यक्ष धनाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी गेल्या तीन वर्षातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. या अधिवेशनात शिक्षण सेवक पद रद्द करा,  जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागण्यांसह २४ जानेवारी चा संच मान्यतेचा अन्यायकारक जीआर रद्द करा, शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट रद्द करा, प्रत्येक शाळेत स्वच्छक व डाटा इंट्री ऑपरेटर नेमा आदी मागण्यांचे ठराव मांडण्यात आले. 
      यावेळी सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून  राजाराम तुकाराम जोशी (कालकुंद्री) तर सरचिटणीस म्हणून विनायक पाटील यांची याशिवाय शिक्षक नेते अनिल शिवनगेकर, युवा शिक्षक नेते प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष प्रल्हाद गावडे, कोषाध्यक्ष मोनाप्पा नाईक, उपाध्यक्षपदी जयवंत पाटील व मारुती चिंचनगी, कार्यवाहक अनंत पाटील, सहचिटणीस वैजनाथ शिवनगेकर यांच्याही निवडी करण्यात  आल्या. नूतन कार्यकारणी सदस्यांचा सत्कार माजी आमदार  राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश पाटील यांनी  शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी माझे वडील कै नरसिंगराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षात शिक्षकांच्या अनेक प्रश्न शासन दरबारी आपण मांडले असून यापुढेही हे कार्य चालूच राहील. अशी ग्वाही दिली.
 खुल्या अधिवेशनासाठी पुणे विभागाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्ह्याचे नेते ज्योतीराम पाटील, शिक्षक बँक चेअरमन सुरेश कोळी, शिक्षक बँक संचालक बाबुराव परिट, तज्ञ संचालक आनंदा कांबळे, चेअरमन राजेंद्र पाटील, सरचिटणीस कमळकर, कार्याध्यक्ष मांडवकर,   पुणे विभागाचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे (शाहूवाडी)  आदींसह चंदगड तालुक्यातील सर्व प्रमुख नेते, आजी-माजी शिक्षक, शिक्षक समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. मावळते सरचिटणीस  एन. व्ही. पाटील यानी मानले.

No comments:

Post a Comment