चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ज्या समाजात आपण जन्म घेतला, त्या समजाप्रती आपण काहीतरी देणे लागत असतो. जो निसर्ग माणसाला सर्व काही विनामूल्य देतो. त्या निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणून चंदगड येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्र चंदगडचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते संदीप गोपाळ कोकरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व विविध प्रकारच्या झाडांची रोपे वाटप करण्यात आली. श्री. कोकारेकर यांनी नगरपंचायत चंदगड, कन्या विद्या मंदिर चंदगड व कुमार विद्या मंदिर चंदगड आणि इतर विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच विविध प्रकारच्या झाडांचे वाटप केले.
यावेळी दौलत कांबळे यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संबंधी माहिती दिली. संदीप कोकरेकर हे सामाजिक संवेदना जागरूक असणारे समाज सेवक आहेत. आपला जन्मदिवसाला अशा सामाजिक आणि पर्यावरण पूरक उपक्रमाची जोड देऊन हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लावला. सर्वांनी आपले आनंदाचे क्षण सामाजिक आणि पर्यावरण बांधिलकी समजून साजरे करावे असे उदगार सुधीर देशपांडे यांनी काढले.
बळीराम पाटील यांनी कार्यक्रम राबवल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संजना संदीप कोकरेकर, प्रभाकर पाटील, सुनील राजापूरकर, कलीम मदार, संजय खासनीस, नारायण सुतार, पांडुरंग सातवणेकर, दौलत कांबळे, संतोष ओउळकर, पिंटू कडोलकर, संदीप माडवळेकर, तुकाराम कसबले, बाळू पडवळे, प्रदीप डफळे, विठ्ठल उंबळकर, बाळकृष्ण फगरे, भैय्या मोरे तसेच शेतकरी चंदगड ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विनायक मुळीक, सुजित कुंदेकर, बळीराम पाटील ,राजू सुतार, वाडेकर साहेब, दत्तात्रय यादव ,यांचे विशेष सहकार्य लाभले.आपला जन्मदिवस अश्या प्रकारे निसर्ग पर्यावरण आणि समाजहित जपून साजरा केल्या बद्दल संदीप कोकरेकर यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment