![]() |
डॉ. आर. एन. साळुंके |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. आर. एन. साळुंके यांची करिअर कट्टा उपक्रमाच्या चंदगड व आजरा तालुका समन्वयकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमासाठी त्यांची निवड झाली आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयएस, आय पी एस, व उद्योजक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येतात,तसेच जवळपास 50 हून अधिक कौशल्य विकास उपक्रम करिअर कट्टा उपक्रमांतर्गत प्रभावीपणे राबवली जातात. डॉ. साळुंखे यांनी हजारो युवक युवतींना विविध ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न प्लेसमेंट सेलच्या वतीने केलेला आहे. त्याचबरोबर विविध तज्ञांची मार्गदर्शनावर व्याख्यान आयोजित करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घातलेले आहे याची दखल घेऊन कोल्हापूर येथील वेदिका कन्सल्टन्सी यांच्या मार्फत उत्कृष्ट प्लेसमेंट ऑफिसर म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे. चंदगड व आजरा या तालुक्यातील विद्यालयातील तरुणांसाठी याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याने डॉ. साळुंके यांच्या या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment