कुदनूर : सी एल वृत्तसेवा
श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर (ता. चंदगड) येथे नुकतीच शालेय मंत्रीमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही निवडणूक गुप्त मतदान प्रणालीद्वारे घेण्यात आली. यानिमित्ताने भारतीय लोकशाहीमध्ये मतदान व निवडणुकीला किती महत्त्व असते हे विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली.
शालेय मंत्रिमंडळासाठी एकूण २९ विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून भाग घेतला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपले कार्य याविषयी मत मांडत आपण कोणत्या पद्धतीने शाळेत विविध उपक्रम राबवू शकतो याबाबत विचार मतदार विद्यार्थ्यांसमोर मांडले व आपणास निवडून देण्याची विनंती केली. यावेळी प्रचलित पद्धतीने निवडणुकीचे कक्ष उभारले गेले. आपल्या आवडत्या उमेदवाराला मत त्या चिठी वरती देत त्यांची मतं मतदान पेटीत बंद झाले. निवडणूक प्रणाली प्रमाणे बोटावरती शाहीचा मार्किंग करत प्रत्येक नोदणी घेत निवडणूक अधिकारी शिक्षकांच्या देखरेखीवर निवडणूक प्रक्रिया अतिशय आनंदामध्ये पार पाडण्यात आली.
मतमोजणी वेळी उमेदवार व मतदार विद्यार्थ्यांची कोण निवडून येणार याबाबत ची उत्सुकता शिगेला पोचली होती.विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापक एस जी पाटील यांनी अभिनंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही निवडणूक लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली. "आजचा मतदार उद्याचा नेता" ही संकल्पना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे. कॅबिनेट मंत्री
🔹 मुख्यमंत्री: अनुष्का गवेकर
🔹 उपमुख्यमंत्री: प्राची पाटील
🔹 विद्यार्थिनी प्रतिनिधी: ज्योती मुतकेकर
🔹 सांस्कृतिक मंत्री: रत्ना कुंभार
🔹 क्रीडा मंत्री: रिषभ निर्मळकर
🔹 सहल मंत्री: साक्षी शहापूरकर
राज्यमंत्री
🔸 बाग मंत्री – सम्राट मोहंगेकर
🔸 प्रार्थना मंत्री – आराना मुल्ला
🔸 आरोग्य मंत्री – श्रावणी सुतार
🔸 स्वच्छता मंत्री - सृष्टी नागरदळेकर
या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक पाटील एस. जी. यांच्या मार्गदर्शना खाली निवगिरे, देसाई, ,बोकडे ,नागेनट्टी , पाटील आर पी , पाटील एन ए, कांबळे टी आर, कांबळे एस एन., गावडे निवडणूक अधिकारी व सर्व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment