![]() |
तहसीलदार चंदगड यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चंदगडचे पदाधिकारी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडील बिएलओ कामे कमी करण्याचे आदेश द्यावे. अशा मागणीची निवेदने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसीलदारांना नुकतीच शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आली. त्या अनुषंगाने सोमवार दि. २८ जुलै रोजी चंदगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने अशा आशयाचे निवेदन तहसीलदार चंदगड यांनाही देण्यात आले. यावेळी बीएलओ आदेशा संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन निवडणूक नायब तहसीलदार यांनी शिष्टमंडळाला दिले.
या भेटीमध्ये तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना काढण्यात आलेल्या आदेशासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बी. एल. ओ. आदेशासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार यांनी संघटनेला दिले.
संघटनेच्या वतीने निवेदन देताना नेते धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, अध्यक्ष राजाराम जोशी, सरचिटणीस विनायक पाटील, प्रल्हाद गावडे, मोनाप्पा नाईक, मारुती चिंचनगी, अनंत पाटील, अनिल शिवणगेकर, नंदू गावडे, गोविंद चांदेकर, हंबीरराव कदम, प्रशांत पाटील, बोरगुले , मोतीलाल कुवर, हनुमंत गायकवाड, के के पाटील, अजय पाटील, मधुकर नागरगोजे, गणेश भांगरे, बोरगुले व शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment