गणेशोत्सव काळात कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा व चंदगडच्या चाकरमान्यांसाठी पुरेशी बससेवा द्या - कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2025

गणेशोत्सव काळात कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा व चंदगडच्या चाकरमान्यांसाठी पुरेशी बससेवा द्या - कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघाची मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सर्वात मोठा व श्रद्धेचे सण असून दरवर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असतो. कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसरातून हजारो प्रवाशी गणपतीसाठी मुंबई व उपनगरातून आपल्या गावी जातात. मात्र, मागील काही वर्षांच्या अनुभवावरून असे दिसते की, नियमित एसटी सेवा या काळात पुरेशा नसतात. परिणामी प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागते. हि गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी चारकरमान्यांसाठी बसेसचे योग्य व्यवस्थापन करा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 

त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे........

    1. गणपतीच्या काळात (चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत) गडहिंग्लज, आजरा, चंदगड आगार येथून या मार्गावर जादा एसटी गाड्या सोडण्यात याव्या.

    2. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोल्हापूर मधूनही वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणी थेट गाड्यांची योजना करण्यात यावी.

    3. ही अतिरिक्त वाहतूक ऑनलाइन आणि प्रत्यक्ष आरक्षणात उपलब्ध ठेवून प्रवाशांना आगाऊ तिकीट बुक करण्याची सुविधा द्यावी.

    4. गणपतीसाठी स्वतंत्र गाड्यांचे वेळापत्रक व माहिती सर्वसामान्य नागरिकांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळवावी. 

No comments:

Post a Comment