चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
![]() |
संजय गोपाळ साबळे |
कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळीतील सक्रीय सहभागासाठी परिचित असलेले संजय गोपाळ साबळे (सहाय्यक शिक्षक, दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड) यांची ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद’च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे (पुणे) यांनी अधिकृतरित्या नियुक्तीपत्र देवून जाहीर केली.
सीमाभागातील साहित्यसेवक व कार्यकर्ते सीमाकवी रविंद्र मारुती पाटील (प्रदेशाध्यक्ष – कर्नाटक) यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली होती. १७ पेक्षा अधिक पुस्तके (कविता, विचारलेखन, चारोळ्या, प्रेरणादायी लेखन) पुरस्कार : ९ जिल्हा व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार, ३ उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.
संजय साबळे हे चंदगड मराठी अध्यापक संघाचे प्रभावी मार्गदर्शक… त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर अगदी शेवटच्या टोकाला असलेला चंदगड तालुका आज नव्या उंचीवर पोहचेल. ही केवळ निवड नाही, तर शिक्षण व साहित्य क्षेत्राला मिळालेला सन्मान आहे. मराठी शिक्षकांच्या हक्कासाठी सजगतेने उभा राहणारा आवाज आता जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.
त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी साहित्याला नवी दिशा, नवसंजीवनी मिळेल असा विश्वास साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे. नियुक्तीबद्दल संजय साबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment