चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा २८ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील व बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मनीषा नेसरकर उपस्थित रहणार आहेत.
यावेळी स्पर्धेत यशस्वी होण्याचे तंत्र या विषयावर कोल्हापूर येथील प्रसिद्ध मार्गदर्शक जॉर्ज क्रूज यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील हे असून यावेळी नवागतांचे स्वागत व गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षणप्रेमी आजी-माजी विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संचालक व विश्वस्त तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment