कुदनूर : सी एल वृत्तसेवा
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं अथेन्स (ग्रीस) येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील पै. रामचंद्र मारुती पवार यांची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे.
युथ ऑलिम्पिक गेम्स, जागतिक कुस्ती स्पर्धा तसेच आशियाई कुस्ती स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून त्यांनी अनेक वेळा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य केलंय. भारतीय सेनेमध्ये मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच त्यांची नुकतीच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे प्रख्यात कोच म्हणून टॅलेंट इडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटी मध्येही नुकतीच निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment