![]() |
आमदार शिवाजीराव पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांचा उद्या बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी वाढदिवस आहे. सकाळी ग्रामददेवतेचे दर्शन आणि घरगुती कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार श्री. पाटील हे स्वराज्य मल्टिपर्पज हॉल, पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ईनाम सावर्डे येथील मध्यवर्ती भाजपा कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार आमदार श्री. पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की शुभेच्छा देण्यासाठी येताना कोणीही हार-तुरे, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, वह्या आणू नयेत. फक्त शुभेच्छा आणि आशीर्वाद स्विकारले जातील असे त्यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment