 |
| कल्याणपूर येथील दुर्गाडी लक्ष्मी मंदिर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कल्याणपूर (ता. चंदगड) येथील दुर्गाडी लक्ष्मी मंदिर मधील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी पेटीतील रोख रक्कम लंपास केली. ही घटना २६ जुलै २०२५ रोजी रात्री दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद मंदिराचे पुजारी अशोक यल्लाप्पा पाटील कल्याणपूर यांनी चंदगड पोलिस ठाणे अंतर्गत कोवाड पोलीस दुरक्षेत्र येथे दि. २८ रोजी दिली आहे.
 |
फोडण्यात आलेली दानपेटी दाखवताना शुभ्रा पाटील
|
शंभर टक्के महादेव कोळी आदिवासी जमातीची लोकवस्ती असलेल्या कल्याणपूर येथील याच मंदिरात सहा महिन्यापूर्वी मंदिराचे लोखंडी गेट, मंदिराचा व गाभाऱ्याच्या दरवाज्याचे कुलूप कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व दागिने लंपास केले होते. या चोरीचा छडा लागण्यापूर्वीच पुन्हा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील एकमेव दुर्गाडी मंदिरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थ व भाविक हतबल झाले आहेत. या चोरीला सवाकलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावावा. अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुबराव पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment