मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंदगड शहरामध्ये मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2025

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंदगड शहरामध्ये मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृतसेवा

        मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंदगड, आजरा व गडहिंग्लजमध्ये मंगळवार दि. २२ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराला चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

    भारतीय जनता पार्टीच्या चंदगड शहरामध्ये श्री देव रवळनाथ मंदिर येथे सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबीर होणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान!” चला, आपण सर्वजण या पुण्य यज्ञात सहभागी होऊया! याने प्रेरीत होवून भाजप चंदगड मंडलामध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. या पुण्य कार्यात सहभागी होऊन, आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा चंदगड शहर अध्यक्ष अमेय सबनीस यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment