गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन हिंदुत्ववादी विचाराची ध्येय धोरण व जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वावर ठेवत, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण तसेच गडहिंग्लज तालुक्यातील शहरातील सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन गडहिंग्लज शहरातील शिवसेना उ.बा.ठा. गटाचे चार उपशहर प्रमुख तसेच एक शाखा प्रमुख कार्यकर्ते यांनी दि. २२/०६/२०२५ रोजी मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
उ.बा.ठा. शिवसेना गटाचे उपशहर प्रमुख संदिप चव्हाण, गजाभाऊ सासणे, अनिल खानाई, काशिनाथ हालसोडे, शाखाप्रमुख नागेश हुलसार, दीपक दावणे, अशोक करडे या सर्व शिवसैनिकांनी मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शहर अध्यक्ष केंपान्ना कोरी, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे,उप तालुका अध्यक्ष अजिम पठाण, तालुका उपाध्यक्ष करण गुलगुंजी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment