तांबुळवाडीच्या कौस्तुभ आरस यांची सायंटिफिक ऑफीसरपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2025

तांबुळवाडीच्या कौस्तुभ आरस यांची सायंटिफिक ऑफीसरपदी निवड

कौस्तुभ आरस

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील कौत्सुभ आरस याची तामीळनाडू राज्यातील कल्पकम येथे भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागामध्ये (NPCIL) सायंटिफीक ऑफीसरपदी निवड झाली.  तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (NTPC) मध्ये वरिष्ठ अधिकारीपदी अशी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी निवड झाली. 

कौत्सुभ आरसचा सत्कार करताना माजी प्राचार्य आर.आय .पाटील, अरूण आप्पाजी पाटील व ग्रामस्थ तांबुळवाडी

    त्यापैकी भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागामधील सायंटिफिक ऑफीसरच्या निवडीला प्रथम पसंती दिली आहे. त्याच्या या निवडीबध्दल तांबुळवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कौत्सुभ, त्याला प्रोत्साहन देणारी त्याची माता स्वप्ना, आजी क्षमा देशपांडे, आजोबा रामचंद्र देशपांडे, मामा सचिन देशपांडे व त्यांच्या कुंटूबाचा सत्कार करण्यात आला. 

कौत्सुभ आरस व त्याची आई , आजोबा व कुटुंबियांचा सत्कार करताना ग्रामस्थ तांबुळवाडी.

    यावेळी माजी प्राचार्य आर. आय. पाटील यांनी कौत्सुभचे एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण विवेक इंग्लिश मेडीअम स्कूल हलकर्णी फाटा येथे झाले. महादेवराव वांद्रे  कॉलेजमधून पॉलिटेक्नीक पदवी पूर्ण केली. मॉडर्न इजिनिंअरिंग कॉलेत पूणे येथून बी. ई. व पुढे चेन्नई येथील आय. आय. टी. कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेमधून एम. टेक. पदवीपर्यंतचा कौत्सुभच्या संघर्षपूर्ण शैक्षणिक भरारीचा आढावा घेतला. 

    यावेळी श्रीनिवास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महादेव दूध संस्थेचे माजी चेअरमन अरुण आप्पाजी पाटील, रमेश देशपांडे, तुकाराम पेडणेकर, पुंडलिक सावंत, संपत पाटील, सुरेश पाटील, परशराम पाटील, दत्तात्रय सावंत, हणमंत मिलके,  सदानंद पाटील, सुभाष भोसले, अशोक  पाटीलसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कौत्सुभच्या या यशाबध्दल सर्वत्र अभिनंदने हात आहे. पुंडलिक सावंत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment