चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कामगार सेवक या पतसंस्थेची 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. एकूण ११ सदस्य असूनही महिला प्रतिनिधी नसल्यामुळे ९ जागा बिनविरोध करण्यात आल्या होत्या. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी महादेव आप्पा फाटक व उपाध्यक्षपदी गोपाळ विठोबा दळवी यांची बिंनविरोध निवड करण्यात आली. ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या निवडणुकीसाठी अजित गोसावी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
संस्थेचे नूतन सदस्यपदी मारुती निगापा पाटील, विठोबा आप्पाजी यादव, अशोक शामराव गावडे, बापूसो बाळकृष्ण दळवी, गजानन बाबुराव कुंभार, विलास लक्ष्मण कांबळे, निंगू संतू नाईक व संस्थेचे सचिव महादेव धुरी व कामगार बंधू व दौलत कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या निवड कार्यक्रमाला अथर्वचे सी. ई. ओ विजय मराठे, संचालक विजय पाटील, एच. आर विभाग प्रमुख अश्रु लाड हे देखील हजर होते. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व नूतन संचालकांचे मनापासून अभिनंदन केले.
संघटना अध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले, ``एकेकाळी दौलत कारखाना अडचणीत असताना या संस्थेने दौलतला कर्ज पुरवठा केला होता. ती रक्कम ७ कोटी रुपये अजूनही दौलत कारखान्याकडून आज पर्यंत मिळालेली नाही. बऱ्याच सेवानिवृत्त कामगार बंधू यांची ठेव रक्कम परत मिळालेली नाही. एके काळी डीव्हिदंड रूपाने सभासदांना सोन्याची अंगठी देणारी ही संस्था आज पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचे मोठे आव्हान नूतन सर्व संचालक व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासदांच्यावर असल्याचे सांगितले.``
संस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ सेवानिवृत्त मार्गदर्शक कामगार शंकर पडते यांच्यासह प्रदीप पवार, संजय देसाई, नारायण तेजम, उत्तम नीचम, इकबाल मदार, दिलीप कदम, चंद्रकांत केसरकर, श्रीकांत पाटील, सत्तुपा घोटने, आप्पाजी गावडे, महादेव शिप्पूरकर, नामदेव कुट्रे, सुधाकर पवार, बाबू चीलगोंदे, संजय हजगुळकर, सुरेश पाटील व संस्थेचे सर्व हितचिंतकांनी यासाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment