निट्टूर गावचे माजी सरपंच व माजी कुस्तीगीर मारुती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2025

निट्टूर गावचे माजी सरपंच व माजी कुस्तीगीर मारुती पाटील यांचे निधन

मारुती गावडू पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
    निट्टूर (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक, गावचे माजी सरपंच, जय शिवराय विकास सेवा सोसायटी, भैरवनाथ दूध संस्था, ताम्रपर्णी पत संस्था कोवाड चे माजी संचालक तसेच जुन्या काळातील सुप्रसिद्ध पैलवान व कुस्ती पंच मारुती गावडू पाटील, वय ८० यांचे दि. ११/०८/२०२५ रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. माजी आमदार व्ही. के. चव्हाण- पाटील यांचे खंदे समर्थक व राजकीय पिंड असलेल्या मारुती पाटील यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून गावचा विकास साधण्याचा अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला.   बलदंड शरीरयष्टी असलेले मारुती पाटील जुन्या काळातील एक सुप्रसिद्ध मल्ल व कुस्ती पंच म्हणून परिचित होते. निट्टूर येथे गुढीपाडवा निमित्त दरवर्षी होणाऱ्या कुस्ती  मैदानाच्या यशस्वीतेसाठी त्यांचे गेली अनेक वर्षे मोठे योगदान होते. डॉक्टर राजू पाटील व रॉयल क्लासेस चे मालक युवराज पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित चिरंजीव, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर निटूर येथे मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment