![]() |
श्रीकांत पाटील |
![]() |
नारायण सुतार |
चंदगड : प्रतिनिधी
राज्यातील सर्वात पहिली व पत्रकारांची मातृसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नारायण सुतार (ता -कागल) तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीकांत पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांची निवड करण्यात आली आहे. नारायण सुतार हे महान कार्य या वृत्तपत्रात कार्यरत आहेत तर श्रीकांत पाटील हे दै.पुढारी ला कार्यरत असून चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एका मजबूत अशा व्यासपीठावर एकत्र येऊन काम करण्यासाठी मिळालेल्या. जबाबदारीची जाणीव ठेवून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ला अधिक बळकटी आणण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे असे जिल्हा संपर्कप्रमुख नारायण सुतार यांनी राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गणपती शिंदे यांच्याकडे भावना व्यक्त केली आहे. तर देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पासून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांतील मराठी पत्रकारांना एकत्र आणण्याचा उद्देश सार्थ ठरवत आहे. आपल्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी मध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होईल असे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment