राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड ग्रामीण रुग्णालयात बालकांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड ग्रामीण रुग्णालयात बालकांची तपासणी

  

 ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशन व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत बाल रुग्णांना उपचार देताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पथक.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चंदगड व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे चंदगड तालुक्यातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदर्भित मुलांचे निदान शिबिर पार पडले. शिबिरात दरम्यान एकूण १७ बालकाचे चेक अप करण्यात आले. यात शिश्नचर्मविकार - ०६, जिव्हा/ जीभ विकार - ०१, हाडाचे विकार/ अस्थिरोग -०१, रक्तशय -०५, हायड्रोसील- ०१, पोटाच्या बेंबी ला फुगा (Umbilical Hernia - ०१, सिस्ट - ०१, SAM- ०१ आदी रुग्णांवर उपचार करण्यात आले.

    शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ.मकानदार, डॉ योगेश पोवार (नोडल ऑफिसर), डॉ स्नेहल पाटील (मेडिकल आफिसर), डॉ पल्लवी निंबाळकर (मेडिकल ऑफिसर), रुचिता बांदेकर (फार्मासिस्ट), कृष्णा परीट (फार्मासिस्ट), छाया पुजारी (परिचारिका) या टीमने अभियान कार्यक्रम यशस्वीपणे राबवला.

No comments:

Post a Comment