कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील सुप्रसिद्ध कथा व कादंबरीकार साहित्यिक कै पांडूरंग कुंभार यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षी 'वेगळ्या वाटा' पुरस्कारासाठी केवळ ललित व चरित्र लेखन साहित्य प्रकारातील उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्कार दिले जाणार आहेत. विजेत्या लेखकांना अनुक्रमे रोख रुपये ५००१, २००१, १००१ तसेच सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरण तारीख नंतर कळविणेत येईल.
लेखक किंवा प्रकाशक यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती व अल्पपरिचय दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोचतील अशा रितीने 'विनायक पांडूरंग कुंभार, रणजित नगर , मु.पो. कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, पिन 416508, मो. नं 9403109477' या पत्त्यावर पाठवावेत. असे आवाहन अनंत पांडूरंग कुंभार 8975324949, संजय पांडूरंग कुंभार 9404977939 यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment