खालसा सावर्डे येथील विष्णू अनगुडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2025

खालसा सावर्डे येथील विष्णू अनगुडे यांचे निधन

विष्णू अनगुडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        खालसा सावर्डे (ता. चंदगड) येथील विष्णू विठोबा अनुगडे (वय वर्ष - ६५) यांचे  शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी अल्पशा आजाराने  निधन झाले.

        काही दिवसापूर्वी ते आजारी पडले होते. तालुक्यातच प्राथमिक उपचार करुन बर वाटल नसल्याने त्यांना केएलई येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना वाचवण्यासाठी अनगुडे परिवाराने शर्तीचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. त्यांच्या जाण्याने अनगुडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

    ते दौलत कारखान्यातून ५ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांनी निवृत्तीनंतर बैलजोडी घेतली होती व ते शेतीची कामे करत होते. गावातील प्रत्येक लोकांची शेतीची कामे करत असल्यामुळे ते प्रत्येक घराघरात त्यांचे जवळचे संबंध होते. लहान मुलांचे ते मामा व मोठ्या माणसांचे विष्णू आप्पा म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. प्रेमळ स्वभाव व काम करण्याची नियोजनबद्ध पद्धत त्यामुळे ते प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने हाडाचा शेतकरी हरपल्याची भावना लोकांतून व्यक्त होत होती. त्यांच्या जाण्याने आणि अनगुडे परिवार पोरका झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, एक बहीण व पाच भाऊ असा परिवार आहे. संदीप जोतिबा पाटील (खालसा सावर्डे) यांचे ते मामा होत.

No comments:

Post a Comment