कुर्तनवाडी येथे शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2025

कुर्तनवाडी येथे शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पंकज पाटील

चंदगड / सी एल वृत्तसेवा
     माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील व चंदगड विधनसभेचे आमदार  शिवाजीराव पाटील यांचे कट्टर समर्थक,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा  चंदगड तालुका (चंदगड मंडल) अध्यक्ष पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन एस. एस. पी. एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि पंकज पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
    हे शिबिर ८ ऑगस्ट २०२५ रोजी कुर्तनवाडी येथे होणार असून नागरिकांना विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिरात जनरल तपासणी, बी.पी., शुगर तपासणी, हाड व सांधेदुखी, त्वचाविकार, स्त्रीरोग,कर्क रोग, दंत रोग, बालरोग व अन्य तज्ज्ञ सेवा मोफत उपलब्ध असणार आहेत.

No comments:

Post a Comment