नागनवाडी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2025

नागनवाडी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

 

आयुष्यमान आरोग्य मंदिर नागनवाडी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ऋतुजा योगेश पवार यांचे अभिनंदन करताना रवींद्र बांदिवडेकर सोबत उपस्थित मान्यवर.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   नागनवाडी (ता. चंदगड) येथील आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्राच्या उत्कृष्ट लोकाभिमुख कार्याबद्दल येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत नागनवाडी यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला‌. उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तथा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा योगेश पवार व स्टाफचे उत्कृष्ट कार्य पाहून नॅशनल क्वालिटी अश्शुरन्स च्या सन्मानासाठी या उपकेंद्राची निवड करण्यात आली. नजीकच्या काळात चार नॉर्मल डिलिव्हरी केल्याबद्दल उपकेंद्र अंतर्गत स्टाफ चा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. या कामी डॉक्टर ऋतुजा यांना आरोग्य सेवक प्रवीण टोपले, आरोग्य सेविका सोनाली कुरले, आशा सेविका वर्षा धनुक्षे आदींचे सहकार्य लाभले. 

   या रुग्णाभिमुख कार्य व सन्मानाची दखल घेऊन नागनवाडी ग्रामपंचायततीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सरपंच शितल बांदिवडेकर व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र बांदिवडेकर नंदकुमार गावडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रा. नि. गावडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांनी उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment