बेळगाव येथे स्वातंत्र्य दिनी माजी नौसेना सैनिक संघटनेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित निवृत्त नौसेना अधिकारी.
बेळगाव : सी एल वृत्तसेवा
भारतीय नौदलात मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे. मराठी मुलांनी नौसेना (इंडियन नेव्ही) मध्ये मोठ्या संख्येने भरती व्हावे. यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असून हे काम आता बेळगाव येथील माजी नौसेना संघटनेच्या वतीने हाती घेतले जाईल. असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. ते माजी नौसेना सैनिक संघटनेच्या वतीने बेळगाव येथे ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
माजी सैनिक कॉम्प्लेक्स, सुभाष नगर- बेळगाव संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण प्रसंगी जगदीश पाटील, कॅप्टन कृष्णा पुरी, दत्तात्रय जाधव, अनिल इक्यापुरे आदी नौसेना अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष अशोक पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. येणाऱ्या वर्षातील नवीन नियोजनाबद्दल माहिती दिली. मुख्यतः भारतीय नौदलाचे बँड पथक बेळगावला आणून लोकांमध्ये देश भावना जागृत करणे, तसेच तरुण-तरुणींना नौसेनेत दाखल होण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. त्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन येत्या काळात करणार असल्याचे सांगितले. मिलिट्री महादेव मंदिर येथील शिवतीर्थावर नौसेनेचे जहाज मॉडेल ठेवण्यात आले आहे. पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या जहाजाचा लाभ बेळगाव शहर तसेच लगतच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, हुक्केरी, खानापूर तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment