चंदगड / सी. एल. वृत्तसेवाश्रीनिवास पाटील
येथील खेडूत शिक्षण मंडळांच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील श्रीनिवास उर्फ बाळू रामचंद्र पाटील तांबुळवाडी. यांची नियुक्ती झाली आहे.
खेडूत शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असणारी ही मातृसंस्था आहे. खेडूत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या विद्याशाखातील सर्व कर्मचारी या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेची उलाढालही उल्लेखनीय आहे. श्रीनिवास पाटील हे गेल्या २७ वर्षाहून अधिक काळ र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व बँकिंग क्षेत्राचा त्यांचा गाढा अनुभव लक्षात घेऊन त्यांची या संस्थेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment