कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर या दोन शाळा तसेच अंगणवाडी मधील मुलांच्या गुणवत्ता वाढ व दर्जेदार शिक्षणासाठी गावातील शाळा व्यवस्थापन समितीने चंदगड येथे नुकतीच गटविकास अधिकारी वृषाली यादव, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील व एकात्मिक बाल विकास अधिकारी वनिता इस्टे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शिष्टमंडळात डॉ. संदेश जाधव, कुमार विद्या मंदिर कुदनूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर गवंडी, सदस्य अमृत कोले, पुंडलिक तवनोजी, तंटामुक्त अध्यक्ष राजू पवार आदींचा समावेश होता. सर्व अधिकाऱ्यांशी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.
No comments:
Post a Comment