माडखोलकर महाविद्यालयाचा बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभागाचा विद्यार्थी सुजय चांदेकर याची टाटा कन्सल्टन्सी सर्विस (TCS) मध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2025

माडखोलकर महाविद्यालयाचा बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभागाचा विद्यार्थी सुजय चांदेकर याची टाटा कन्सल्टन्सी सर्विस (TCS) मध्ये निवड

सुजय चांदेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभागाचा विद्यार्थी सुजय नंदकुमार चांदेकर (कुर्तनवाडी) याची भारतातील आघाडीच्या आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विस (TCS) यामध्ये निवड झाले आहे.

     भारतातील अतिशय नामांकित व आघाडीच्या असणाऱ्या टीसीएस मध्ये निवड झालेला सुजय चांदेकर हा या भागातील एकमेव विद्यार्थी आहे.  चांदेकर हा महाविद्यालयातील प्रयोगशाळा  कर्मचारी नंदकुमार चांदेकर यांचा सुपुत्र होय. अतिशय हुशार व प्रामाणिक असणाऱ्या सुजय चांदेकरला संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर व्ही. आजरेकर  प्रा.सचिन गावडे, प्रा.प्रदीप गवस, यांचे मार्गदर्शन लाभले.

     प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी त्याचे अभिनंदन केले.  या निवडीबद्दल खेडूत शिक्षण संस्थेने त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment