कुदनूर येथील राजीव गांधी सह. पतसंस्थेस ५२ लाख रुपये नफा, सभासदांना १२ टक्के लाभांश - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2025

कुदनूर येथील राजीव गांधी सह. पतसंस्थेस ५२ लाख रुपये नफा, सभासदांना १२ टक्के लाभांश

  

राजीव गांधी पतसंस्थेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    कुदनूर (ता. चंदगड) येथील राजीव गांधी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुदनूर येथे खेळीमेळीत पार पडली.  चेअरमन पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. 

      संचालक प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य शाखा व्यवस्थापक नामदेव कोकितकर यांनी अहवाल वाचन केले. अहवाल वर्षात संस्थेस रुपये ५२,०७,७०७  इतका नफा झाला असून सभासदांना यंदा १२ टक्के लाभांश घोषित करण्यात आला आहे. संस्थेकडे २५.८९ कोटी हून अधिक ठेवी असून संस्थेने सुमारे २५ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. सभासदांनी वेळेत कर्ज फेड करून कटू कारवाई टाळावी असे आवाहन मॅनेजर कोकीतकर यांनी केले. संस्थेच्या कुदनूर सह कोवाड, राजगोळी खुर्द, हलकर्णी फाटा, यशवंतनगर येथे शाखा असून मुख्य शाखेच्या उत्कृष्ट कर्ज वसुली बद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश हेब्बाळकर, भरत गावडे, मधुकर आंबेवाडकर, बाळू चौगुले, सदू पाटील आदींनी भाग्य घेतला.  यावेळी व्हा. चेअरमन अशोक गवंडी, शमशुद्दीन वंटीगाल, उत्तम कोकितकर, कलाप्पा कांबळे, कृष्ण मांडेकर, जोतिबा पवार, सिद्धाप्पा हडलगेकर, संतराम मोहनगेरकर, जिल्हा सहकार बोर्ड अधिकारी एस एस देसाई, विजया कोकितकर आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. हलकर्णी शाखा सल्लागार शंकर भेंडूळकर यांची गावातील दूध संस्था चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कुंभार यांनी केले. तानाजी गडकरी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment