![]() |
कुदनूर येथील लक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना मॅनेजर बाळकृष्ण नागरदळेकर |
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्थेची ५० वी सुवर्ण महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक १८/०८/२०२५ रोजी खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन यशवंत बामणे होते. संचालक चंद्रकांत निर्मळकर यांनी स्वागत केले.
सुरुवातीस दिवंगत संचालक कै. लक्ष्मण कोले तसेच पहलगाम हल्ला व गुजरात विमान दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मानद सचिव मौला जमादार यांनी प्रास्ताविक केले. संचालक सिद्राम गुंडकल यांनी संस्थेच्या ५० वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. सचिव बाळकृष्ण नागरदळेकर यांनी विषय पत्रिकेवरील विषय व अहवाल वाचन केले. संस्थेने यंदा सभासदांना १३ % लाभांश जाहीर केला. यावेळी झालेल्या चर्चेत माजी जिप. सदस्य शंकर आंबेवाडकर, बी. के. पाटील, पी. बी. पाटील, सुरेश कुंभार, कृष्णा मांडेकर, प्रकाश हेब्बाळकर, रामचंद्र बामणे, दत्तू पवार, सिद्धू आंबेवाडकर, शिवाजी मोहनगेकर आदींनी भाग घेतला. शशिकांत सुतार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment