चंदगड / सी एल वृतसेवा
प्रेमचंदांचे व्यक्तित्व साहित्य हे वर्तमान पिढीसमोर आरसा असून ते सद्यस्थितीत प्रासंगिक ठरत आहे, यांच्या साहित्यामध्ये शोषित, वंचित बहुजन उपेक्षित वर्ग याचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यानी त्यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास करावा असे आवाहन हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.
ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयात थोर साहित्यिक, लेखणीचे शिलेदार मुन्शी प्रेमचंद यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सोनापा गोरल होते.
डॉ. पाटील पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या जुलमी व्यवस्थेला विरोध करून सर्वसामान्यांच्यात स्फुल्लिंग चेतवले व प्रसंगी तुरुंगावास ही भोगला. परंपरांना छेद देत सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःपासून केली या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटते त्यामुळे त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांनी आवर्जून अभ्यासावे असे आवाहनही त्यांनी बोलताना केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरल यांनी मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्य, अभ्यासण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. सौ रंजना कमलाकर- सूर्यवंशी यांनी केले.
सूत्रसंचालन भास्कर वाके यांनी केले तर आभार कीर्ती वाघराळे मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment