कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी व खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री या शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण शंकर तथा एल. एस. कोले (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने आज बुधवार दि. ६/८/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन चिरंजीव, सुना, नातवंडे, चार भाऊ असा परिवार आहे.
खेडूत शिक्षण संस्थेत त्यांनी शिक्षक म्हणून ३७ वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी कालकुंद्री, चंदगड व कार्वे येथील हायस्कूलमध्ये सेवा बजावली होती. कुदनूर येथील नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे ते सुमारे २५ वर्षे चेअरमन होते. कुदनूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment